
मुंबई | Mumbai
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) हे भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे....
मार्च महिन्यात उद्धव ठाकरे हे मुंबईत विरोधीपक्षांच्या सभा घेण्याच्या तयारीत आहेत. यापार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक आयोगाने शिवसेनेची सूत्र अधिकृतरित्या सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग तसेच केंद्रातील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.
यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत घोषणा केली होती की, मार्च महिन्यात देशभरातील विरोधीपक्षांची सभा आयोजित करण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत.
केजरीवाल आणि मान हे दोघेही एक दिवसांच्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे दोन्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मातोश्रीवर ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतील.