Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमलाही अटक करा..!; 'ते' पोस्टर शेअर करत राहुल गांधींचं केंद्र सरकारला आव्हान

मलाही अटक करा..!; ‘ते’ पोस्टर शेअर करत राहुल गांधींचं केंद्र सरकारला आव्हान

दिल्ली | Delhi

राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करोना लसीकरणाबाबत टीका करणारी पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २५ लोकांना अटक केली होती. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मलाही अटक करा असं आव्हान करत पोस्टर शेअर केलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारला आव्हान केलं आहे. ‘मलाही अटक करा’ असं आव्हान राहुल यांनी केलं असून आमच्या मुलांची करोना प्रतिबंधक लस विदेशात का पाठवली, असा प्रश्न विचारला आहे.

तसेच प्रियंका गांधी यांनी याच पोस्टरचे फोटो ट्विटरच्या प्रोफाईलवर लावले आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही हेच पाऊल उचललंय.

देशात करोनाचा कहर सुरु असताना केंद्र सरकारने विदेशांना लशीचा पुरवठा केला होता. या संदर्भात दिल्लीतील काही लोकांनी ‘मोदीजी हमारे बच्चो की व्हॅक्सिन विदेश क्यों भेजी’ असा सवाल करणारे पोस्टर दिल्लीतील अनेक भागांमध्ये लावत केंद्र सरकारवर टीका केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केले आणि २५ जणांना अटक केली होती.

देशभरात करोनाच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा जाणवत आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घ्यायलाही प्रचंड उशीर होत असल्याचं त्यामुळं समोर येतंय. महाराष्ट्रात तर १८-४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेकच लागला आहे. या सर्व मु्द्द्यांवरून केंद् सरकारवर विविध आरोप होत आहेत. देशातील नागरिकांना लस नसताना विदेशामध्ये लसींचे डोस का पाठवले असा सवालही मोदींना विचारला जात आहे. मात्र आता त्यावरून एक मोठा वाद उभा राहिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या