Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीसांच्या मर्जीतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयात

फडणवीसांच्या मर्जीतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयात

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विशेष मर्जीतील ओळखले जाणारे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ब्रिजेश सिंह (Brijesh Singh) यांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे…

- Advertisement -

गृह विभागाने सोमवारी सिंह यांच्या नव्या नियुक्तीचा आदेश जारी केला. सिंह यांच्या नियुक्तीमुळे मुख्यमंत्री कार्यालयात घडणाऱ्या घडामोडींची आणि महत्वाच्या फाईलींची माहिती फडणवीस यांच्यापर्यंत विनासायास पोहचणार असल्याचे बोलले जाते.

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून भूषण गगराणी तर प्रधान सचिव म्हणून विकास खारगे हे कार्यरत आहेत. आता प्रधान सचिव म्हणून ब्रिजेश सिंह यांची नियुक्ती झाल्याने त्यांना कोणती जबाबदारी देतात याकडे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. पोलीस सेवेतील अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेनमध्ये दाखल, चर्चांना उधाण…

कोण आहेत ब्रिजेश सिंह?

ब्रिजेश सिंह हे १९९६ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सिंह हे माहिती आणि जनसंपर्क खात्याचे महासंचालक होते. याशिवाय सायबर गुन्हे शाखेचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. एक प्रभावशाली अधिकारी म्हणून फडणवीस सरकारमध्ये त्यांची ओळख होती.

मात्र, २०१९ मध्ये सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ब्रिजेश सिंह यांची माहिती आणि जनसंपर्क खात्यातून उचलबांगडी करत त्यांची बदली होमगार्डच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी करण्यात आली होती. आता महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर ब्रिजेश सिंह यांचे मंत्रालयात पुनरागमन झाले आहे.

भगतसिंह कोश्यारींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, जबरदस्तीने त्यांना…

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात यशस्वी ठरले आहेत. याआधी फडणवीस यांनी राज्य सुरक्षा महामंडळावर सह व्यवस्थापकीय संचालकपदावर असलेल्या देवेन भारती यांच्यासाठी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करून त्यांची वर्णी लावली आहे. आता लवकरच ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनाही महत्वाच्या पदावर नेमले जाईल, अशी चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या