Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभाजपला कर्जत तालुक्यामध्ये आणखी एक धक्का

भाजपला कर्जत तालुक्यामध्ये आणखी एक धक्का

कर्जत l प्रतिनिधी l Karjat

भारतीय जनता पक्षाला कर्जत तालुक्यामध्ये आणखी एक धक्का बसला आहे. महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष कांताबाई बापूसाहेब नेटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीपूर्वीच भाजपला हे धक्के बसत आहेत.

- Advertisement -

29 सप्टेंबर रोजी माजी उपनगराध्यक्ष बापुसाहेब उर्फ नेटके मेजर, तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेविका मनीषा सोनमाळी, डॉक्टर प्रकाश भंडारी यांनी भाजपला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. भारतीय जनता पक्ष या धक्क्यातून सावरत असतानाच आज पुन्हा पक्षाला एक धक्का बसला आहे. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष व पंचायत समितीच्या माजी उपसभापती कांताबाई नेटके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या नीता पिसाळ यांनी देखील भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपला लागलेल्या या गळतीचे आगामी नगरपंचायत निवडणुकीमध्ये परिणाम जाणवू शकतात.

आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष कांताबाई बापूसाहेब नेटके यांनी तालुक्यातील गायकरवाडी व बरगेवाडी येथील कार्यक्रमांमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत नीता पिसाळ यांनी देखील भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कर्जत नगरपंचायतीच्या विरोधी पक्षनेते पूजा मेहेत्रे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहिनी घुले, बापूसाहेब नेटके कुशाभाऊ नेटके, संतोष मेहेत्रे, विजय नेटके, राहुल नेटके व मनोज गायकवाड आणि मोठ्या संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या