Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासोमय्यांची दापोलीकडे कूच; परब म्हणाले, हिंमत असेल तर...

सोमय्यांची दापोलीकडे कूच; परब म्हणाले, हिंमत असेल तर…

मुंबई | Mumbai

भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परबांच्या (Anil Parab) अनधिकृत रिसॉर्ट तोडण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांनी प्रतिकात्मक हातोडादेखील बनवला होती. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली येथे बांधण्यात आलेले रिसॉर्ट अनिल परब (Anil Parab) यांच्या मालकीचे असून ते अनधिकृतपणे बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला…

- Advertisement -

किरीट सोमय्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. ते दापोलीकडे निघाले असताना त्यांना पोलिसांनी कशेडी घाट उतरल्यावर अडवले. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस देऊ केली.

त्यानंतर सोमय्यांनी पोलिसांसोबत (Police) जोरात वाद घालत नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. पोलिसांचा विरोध झुगारुन किरीट सोमय्यांची दापोलीकडे कूच केले आहे.

या प्रकरणावर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते रिसॉर्ट (Resort) माझे नाही. यासंबंधी ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात (Court) याचिकादेखील दाखल केली आहे. किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत.

रिसॉर्टवर ज्यांना रोजगार मिळतोय ते भयभीत झालेत. मी पुन्हा आता हायकोर्टात (High Court) जाणार आहे. कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम सोमय्या करत आहेत. हिंमत असेल तर तोडून दाखवा, ते फक्त नौटंकी करत आहेत, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या