शिंदखेडा मतदार संघात राबविणार दहशदवाद विरोधी अभियान

jalgaon-digital
1 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिंदखेडा मतदार संघात गेल्या 15 वर्षांपासून आ. जयकुमार रावल यांनी प्रचंड दहशत निर्माण केली असून ती कमी करण्यासाठी आपण या मतदार संघात ‘मोडून काढा दहशदवाद जागृती अभियान’ असा उपक्रम राबविणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

याबाबत श्री. गोटे यांनी आज पत्रक प्रसिध्दीस देवून या अभियानाचा 24 जानेवारी ते 18 फेब्रुवारी असा कालावधी देखील निश्चित केल्याचे म्हटले आहे.

तालुक्यातील टाकरखेडा येथील आ. रावल यांच्या फार्म हाऊसमध्ये शिरल्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे रावल विरुध्द गोटे अशी जुंपली आहे.

याचाच एक भाग म्हणून श्री. गोटे यांनी हे अभियान राबविण्याचे जाहिर केले असून आ. रावल हे धुळेकरांची माफी मागत नाही तोवर आपला संघर्ष सुरुच राहिल, असे सांगत 18 फेब्रुवारी रोजी दोंडाईचा या अभियानाचा समारोप होईल, असेही कळविले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *