अनिल देशमुखांची प्रकृती बिघडली; जे जे रुग्णालयात दाखल

गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख Courtesy : Facebook/Anil Deshmukh

मुंबई | Mumbai

मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये (money laundering case) ईडीच्या (ed) अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना जे जे रुग्णालयात (JJ hospital) दाखल करण्यात आलं आहे.

अनिल देशमुख आज अर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने व त्रास जास्त असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. सकाळी ११ वाजताची ही घटना आहे.

दरम्यान अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रियेसाठी त्यांना एप्रिल महिन्यात जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com