Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविरोधी पक्षनेते फडणवीसही 'लाव रे तो व्हिडिओ'च्या प्रेमात

विरोधी पक्षनेते फडणवीसही ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या प्रेमात

लातूर | Latur

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज ठाकरे यांच्या मार्गावरुन गेले. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस सध्या उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ दाखवला. त्यामुळे फडणवीस हे राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या प्रेमात पडल्याची चर्चा राजकी वर्तुळात रंगली आहे. फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला.

मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर काही दिलासा मिळालेला दिसत नाही अशी टीका करताना इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, घोषणा करुन समाधान होणार नाही असं ते म्हणाले आहेत. ‘जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तेच इतकं राजकीय बोलत आहेत. हे योग्य नाही. मला राजकारणात रस नाही. तुम्ही राजकीय बोललात तर मी राजकीय बोलेन. संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल अशा वक्तव्याची अपेक्षा आपण राज्य सरकारकडून करत आहोत,” असं यावेळी फडणवीसांनी म्हटलं. “शरद पवारांना सगळं माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत. पंतप्रधान संवेदनशील आहेत ते मदत करतील. युपीएपेक्षा जास्त मदत सरकार करेल,” असंही ते म्हणाले आहेत.

“या सरकाराचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करत असून चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या इतका जाणकार कोणीच नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मी याआधी कधीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली नाही. दौरा करा, करु नका पण भरघोस मदत करा,” अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. केंद्र सरकार मदत नक्की करेलच पण राज्याने केंद्रावर अवलंबून न राहता तातडीने मदत जाहीर करावी अस आवाहन फडणवीसांनी केलं.केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी.प्रत्येक गोष्टीला केंद्रावर खापर फोडू नका असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या