जाहीर माफी मागा, अन्यथा...; अमृता फडणवीसांचा मलिकांना इशारा

जाहीर माफी मागा, अन्यथा...; अमृता फडणवीसांचा मलिकांना इशारा

मुंबई | Mumbai

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नवाब मलिक यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे...

फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याचा तसेच त्यांच्या जावयाच्या घरात अमली पदार्थ सापडल्याचा दावा केला होता. नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नवाब मलिक (Nawab Malik) यांची कन्या निलोफर मलिक (Nilofer Malik) यांनी कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली. फडणवीसांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

त्यानंतर आता नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी जाहीर माफी मागून पुढील ४८ तासात हे ट्विट डिलिट, अन्यथा अब्रूनुकसानीच्या कारवाईला सामोरे जा, असा इशाराच अमृता फडणवीस यांनी दिला आहे.

जाहीर माफी मागा, अन्यथा...; अमृता फडणवीसांचा मलिकांना इशारा
मुंबई ड्रग्स प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

नवाब मलिक यांनी काही फोटो शेअर केले आहेत. त्यात काही आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. त्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांखाली तक्रारीसह अब्रूनुकसानीची नोटीस पाठवण्यात येत आहे. नवाब मलिक यांनी जाहीर माफी मागावी व ट्विट ४८ तासात डिलिट करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com