
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कॉंग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला आहे. केंद्रामध्ये काँग्रेस (Congress) सत्तेत असताना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना खोट्या चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी सीबीआयने (CBI) आपल्यावर दबाव टाकला, असा दावा त्यांनी केला आहे...
केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधक वारंवार करत असून यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिण्यात आले आहे. याच आरोपावर अमित शाह एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अमित शाह यांनी म्हटले आहे की, केंद्रात काँग्रेस सरकार असताना नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी सीबीआय वारंवार माझ्यावर त्यांना खोट्या चकमक प्रकरणात अडकवण्यास सांगत होती. मात्र यानंतरही भाजपने कधीही आरडाओरड केली नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
ते पुढे म्हणाले की, मी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा बळी आहे. काँग्रेसने आमच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला नव्हता का? एक एन्काउंटर झाले. तेव्हा मी गुजरात राज्याचा गृहमंत्री होतो. सीबीआयने मला अटक केली. जर काँग्रेस सरकारने ते मिटवले नसेल, तर आजही सीबीआयच्या रेकॉर्डमध्ये असेल. 90 टक्के प्रश्नांमध्ये हेच होते की, 'तुम्ही कशाला त्रास घेताय, मोदींचे नाव घ्या, तुम्हाला सोडून देऊ, असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे.