Amit Shah : अमित शाहांचे मराठीतून ट्वीट; म्हणाले...

Amit Shah : अमित शाहांचे मराठीतून ट्वीट; म्हणाले...

मुंबई | Mumbai

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले आहेत. लालबागचा राजाच्या दर्शनाने शाहांचा दौरा सुरु होणार आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शाहांनी चर्चा केली. सह्याद्री अतिथिगृहावर या तिघांची भेट झाली.

अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहे. लालबाग परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. स्पेशल ब्रांचचे अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, सोबतच काही अधिकारी देखील तैनात करण्यात आले आहेत. मात्र लालबागला जाण्याआधी अमित शाह यांनी मराठीतून एक ट्विट केलं आहे.

"गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल." असं ट्वीट अमित शाहांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com