Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअमित शाहांचं ओवेसींना आवाहन, म्हणाले “मी विनंती करतो की...”

अमित शाहांचं ओवेसींना आवाहन, म्हणाले “मी विनंती करतो की…”

दिल्ली | Delhi

एमआयएम (AIMIM) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (assaduddin owaisi) यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज राज्यसभेत सरकारच्यावतीनं प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ओवैसींवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातील माहिती देतानाच ओवैसींनी केंद्राकडून देण्यात आलेली झेड दर्जाची सुरक्षा (z plus security) स्वीकारावी अशी विनंती केलीय. आपलं अधिकृत निवेदन संपल्याचं जाहीर केल्यानंतर शाह यांनी अगदीच अनपेक्षितपणे ओवैसी यांना सुरक्षा स्वीकारण्याची विनंती केल्याचं चित्र पहायला मिळालं.

- Advertisement -

अमित शाह म्हणाले की, ओवेसी यांचा हापूडमध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता किंवा ते त्या मार्गावरून निघाल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली नव्हती. तरीही ओवेसी यांना माझी विनंती आहे की त्यांनी सरकारकडून दिली जाणारी सुरक्षा स्वीकार करावी, असं अमित शाह म्हणाले.

ओवेसींवर झालल्या हल्ल्याची माहिती देताना अमित शाह म्हणाले की, ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी संध्याकाळी ५.२० वाजता खासदार असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेशातील मेरठमधील कार्यक्रम संपल्यावर दिल्लीकडे येत होते. छिजारसी टोल प्लाझा जवळ त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आहे. या घटनेमध्ये ओवैसींना कोणती इजा झाली नाही परंतु त्यांच्या गाडीच्या खालच्या बाजूला ३ गोळा लागल्या असल्याची खूण आहे. तीन प्रत्यक्षदर्शींनी घटना पाहिली आहे. या संदर्भात दोघांना अटक करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ३७० अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान असदुद्दीन ओवेसी मेरठहून प्रचार सभेनंतर परतत असताना हापूड टोल प्लाझा येथे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये ३-४ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ज्याबाबत ओवेसींनी स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. त्यानंतर पिलखुवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या