Saturday, April 27, 2024
Homeराजकीयतिथीनुसार शिवजयंतीवरून अमोल मिटकरी-अमेय खोपकर यांच्यात ट्विटरवॉर!

तिथीनुसार शिवजयंतीवरून अमोल मिटकरी-अमेय खोपकर यांच्यात ट्विटरवॉर!

मुंबई | Mumbai

राज्यात काल तिथीनुसार शिवजयंती (Shibjayanti) उत्साहात साजरी करण्यात आली. एकीकडे मनसेने (MNS) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) उपस्थितीत शिवजयंती साजरी केली तर दुसरीकडे मुख्यमंत्रीही विमानतळाबाहेर असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते.

- Advertisement -

दरम्यान तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याच मुद्द्यावरून मनसेचे अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन मनसे नेत अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्यांच्यातील हा वाद ट्विटरवरतीदेखील सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

अमोल मिटकरी यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण असल्याचे म्हटले होते. यावर अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर देत अमोल मिटकरी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत असे म्हटले आहे. ‘तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.’ असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

अमेय खोपकर यांच्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी देखील प्रत्युत्तर दिले असून, आपल्या ट्विटमध्ये “माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही” असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मिटकरी यांनी केलेल्या ट्वीटला अमेय खोपकर परत काही प्रत्युत्तर देतील, की हा वाद येथेच शमेल याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांच्यातील शाब्दिक वाद राष्ट्रवादी विरुद्ध मनसे असा वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या