महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत अमरिंदर सिंग यांचे मोठे विधान, म्हणाले...

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत अमरिंदर सिंग यांचे मोठे विधान, म्हणाले...

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) वेगवेगळ्या मुद्यांवरून चर्चेत आहेत. अलीकडे त्यांनी महापुरुष आणि आदर्शांविषयी केलेल्या विधानांवरून विरोधी पक्षातील (opposition party) नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर महाराष्ट्राचे पुढचे राज्यपाल कोण असतील याबाबत आता जोरदार चर्चा देखील सुरू झाली आहे. राज्यपाल पदासाठी पंजाबचे (Punjab) माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता खुद्द कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) यांनीच राज्यपालपदाबाबत मोठा खुलासा केला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत अमरिंदर सिंग यांचे मोठे विधान, म्हणाले...
दिंडोरीतील 'त्या' दरोडयाची उकल; आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोर जेरबंद

आता या चर्चेवर अमरिंदर सिंग यांनी मौन सोडले आहे. आपल्याला याबाबत कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी नकार देखील दिलेला नाही. याबाबत पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबाबत अमरिंदर सिंग यांचे मोठे विधान, म्हणाले...
सिन्नर : 'त्या' खुनातील तरुणाला बेड्या; वडिलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून केली होती हत्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जीथे सांगतील तिथे मी जाईल असे सांगत येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमके कोण विराजमान होईल, की मग आणखी काही दिवस भगतसिंह कोश्यारी हेच कायम राहतील हे स्पष्ट होऊ शकले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com