Saturday, April 27, 2024
Homeराजकीयभुसावळ : आमदारांचे वक्तव्य मानसिक संतुलन बिघडल्यासारखे

भुसावळ : आमदारांचे वक्तव्य मानसिक संतुलन बिघडल्यासारखे

भुसावळ – तालुक्यातील हतनुरजवळील प्रस्तावित एसआरपीएफ प्रशिक्षण प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात कशामुळे याबाबतच्या आपल्या वक्तव्यानंतर आ. संजय सावकारे यांनी केलेले वक्तव्य हे मानसिक संतुलन खराब झाल्यासारखे असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केला.

येथील सुरभी नगरातील आपल्या कार्यालयात दि. 2 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तालुक्यातील एसआरपीएफ प्रकल्प, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेले टेक्सटाईल प्रकल्प, प्लास्टीक पार्क व स्वत: आमदार राज्य मंत्री असतांना कृषी संशोधन केंद्राची घोषणा केली होती. हे चारही प्रकल्प इतरत्र हलविण्यात आले आहे. यातील टेक्सटाईल प्रकल्प आ. गिरीष महाजनांनीच जामनेरला वळविल्याचे स्वत: आमदारांनी कबुल केले आहे.

- Advertisement -

प्रकल्पांसाठी तालुक्यात प्रतिकुल परिस्थिती नसतांना मुख्यमंत्री व मंत्री कोणत्या आधारे घोषणा करताता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रकल्पाला 1996 मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी माजी आमदार झोपले होते का? या आमदारांच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, सन 2009 पर्यंत वरणगाव, हतनूर परिसर मुक्ताईनगर मतदार संघात होते. तर माजी आमदार म्हणणे एकनाथराव खडसे यांच्यावर आ. सावकारेंचा रोष आहे का? त्यांनी नाथा भाऊंबद्दल केलेले हे वक्तव्या त्यांचा अपमान करणारे आहे. ते आपण खपूव घेणार नाही.

आ.सावकारे तालुक्यातील विकासाबाबत बोलता. मात्र येथील एमआयडीसीचा खरा विकास माजी आ. दिलीप भोळे यांच्याच कार्यकाळात झाला आहे. त्यांनीच वीज, रस्ते, पाणी तेथे आणले असल्याने श्री. नेमाडे याननी सांगितले

न.पा.शी संबंध कसा नाही – 2016 च्या नगरपालिका निवडणुकी दरम्यान आ. सावकारे यांनी, माझ्या विचाराची लोक निवडून द्या शंभर दिवसात विकास करेल असे सांगितले होते. मात्र आता पालिकेशी आमदारांचा काहीच संबंध नसल्याचे सांगत पळवाट काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आपण काय केले ? – आपण नगराध्यक्ष असतांना शासनाने प्राथमिक विकासासाठी 10 कोटींच्या अनुदानसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार निधी उपलब्ध झाला होता. मात्र ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविली होता. त्यावेळी न.पा.चा निधी बांधकाम विभागाकडे का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. म्हणून निधीसाठी न्याय हक्कानुसार मागणी केली होती. शहरात एलईटी लाईटच्या काम आपण प्रस्तावित केले होते. त्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजनेतून 80 लाखांचा निधी आला होता. त्यानंतर मात्र सत्तांतर झाले. 47 घंटागाड्यांची संकल्पना आपलीच होती. त्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केला.

नगरोत्थान योजने अंतर्गत दोन ओव्हर ब्रीज, सात मोठ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार होते. त्यासाठी 98 कोटींचा निधी मंजुर होवून 11 कोटी बँकेतही वर्ग झाले होते. त्यावेळी नगरोत्थानचे निकष बदलवून अमृत योजना आली आहे. ती सद्या कार्यान्वित होत आहे. नाट्यगृहासाठी आपण प्रयत्न केले. मात्र सत्तांतरानंतर त्याकडे विद्यमान सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने तीन कोटींचा निधी परत गेला. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाचाही विकास करण्यात आला मात्र सत्ताधार्‍यांनी ठेकेदाराचे पैसे न दिल्याने ते ही रखडले आहे. रिंग रोडच्या ठेकेदाराला ही शिविगाळ करण्यात आल्याने ते काम ही रखडले आहे. शहरातील नाल्यांवर 23 कोटी 74 लाखांच्या खर्चातून हॉकर्स झोन तयार केला होता. मात्र त्यातही राजकारण करण्यात आले. पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी आपल्याला टार्गेट करुन बदनाम करण्यात येत असल्याचे नेमाडे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या