शिंदे-फडणवीस सरकारमधील 'या' मंत्र्याच्या खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप

File Photo
File Photo

मुंबई | Mumbai

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या खात्यावर महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्य संघटनेने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. तसेच मंत्री राठोड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील या संघटनेने केली आहे...

File Photo
'मी कुणाच्या...'; संजय राऊतांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या राज्य संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) पत्र लिहिले असून या पत्राद्वारे मंत्री संजय राठोड यांच्या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप (Complaint Letter To Eknath Shinde) करण्यात आला आहे. या तक्रारीकडे राज्य सरकारने गांभीर्याने बघावे अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन उभे करून बंद पुकारण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

File Photo
निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO
File Photo
Nashik : विहिरीचा बार उडविताना भीषण दुर्घटना; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री व यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (Maharashtra State Chemist and Druggist Association) केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त झाल्याचा या पत्रात नमूद केला आहे.

राज्यातील औषध विक्रेत्यांच्या प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्वारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात. मात्र औषध दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे औषध विक्रीचे परवाने काही काळाकरता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करणे, अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे संघटनेने या पत्रात म्हटले आहे.

तसेच परवाने कायमस्वरूपी रद्द करणे अशा प्रकारची कारवाई केली जात असल्याचे संघटनेने या पत्रात म्हटले आहे. शिवाय अनेक छोट्या मोठ्या त्रुटींसाठी औषध विकेत्यांना आवाजवी शिक्षा केली जात आहे. प्रत्यक्षात औषध विक्रेत्यांना मंत्र्यांचे पीएस, ओएसडी यांच्यावर प्रचंड पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार सुद्धा या पत्रात करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com