ग्रा.पं.निवडणूकांसाठी सर्वच पक्षांनी लावली ताकद पणाला

निवडणुकांची रणधुमाळी, चिन्हांचे वाटप
ग्रा.पं.निवडणूकांसाठी सर्वच पक्षांनी लावली ताकद पणाला

जळगाव - jalgaon

जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूका या स्थानिक पातळीवर पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, तर विरोधात भाजपा व अन्य मित्र पक्ष आहेत.

त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींवर आपले पॅनल बसविण्यासाठी सर्वच पक्षांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूकां या कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे जेथे कॉंग्रेस तुल्यबळ आहे तेथे स्वबळावरच निवडणूक लढविण्यावर भर दिला जात असल्याचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी म्हटले आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात निवडणूकांची रणधुमाळी खर्‍या अर्थाने रंगत आणणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या पदाधिकारी कार्यकत्यर्ंांसाठी महत्वाच्या असून सरपंच सदस्य पदावर आपली परंपरा रहावी यासाठी प्रत्येक पक्ष कार्यरत आहे. या माध्यमातून राज्यात महाविकास आघाडीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे सत्तेत असूनही निवडणूकांच्या अगोदरच शिवसेना पदाधिकार्‍यांनी त्यांचे प्राबल्य असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांवर पॅनल बिनविरोध निवड घोषित केली.

तर अजून राष्ट्रवादीच्या गोटात मात्र नियोजनच सुरू असल्याने राष्ट्रवादी पॅनलकृत कोणतीही ग्रामपंचायत बिनविरोध सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे घोषित झालेले नाही.  

आज माघारीनंतर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना कपबशी, शिटी, पतंग, माउस, टि.व्ही, बॅट, बॉल, नारळ असे चिन्ह आहेत. त्यामुळे  कोणाची कपबशी फुटणार, कोणाचा पतंग हवेत जाणार कि गिरकी घेत खाली येणार वा बॅट बॉल मैदानात खेळणार याचा फैसला दि.१५ जानेवारीलाच समजेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com