Sunday, May 5, 2024
Homeराजकीय'ऑल इज वेल' म्हणत सिद्धू यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे

‘ऑल इज वेल’ म्हणत सिद्धू यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला मागे

दिल्ली l Delhi

पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंग सिद्धू यांची कॉंग्रेसने निवड केली होती. मात्र काही दिवसातच सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सिद्धू यांनी अचानक राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने पंजाब काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

- Advertisement -

दरम्यान नाराजी व्यक्त करत राजीनामास्त्र उगारलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांनी काल शुक्रवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर त्यांनी आता राजीनाम्याचा आपला निर्णय मागे घेत पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबलं आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर १८ दिवसांनी अखेर तो मागे घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या