सिताराम भांगरे
सिताराम भांगरे
राजकीय

अकोलेच्या आमदारांनी मांसाहार सोडला आनंदाची गोष्ट- भांगरे

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

अकोल्याच्या आमदारांनी मांसाहार सोडला हे ऐकून आनंद वाटला, त्यांचे अभिनंदन. परंतु मुळात प्रश्न मटण खाण्याचा नसून कंटेनमेंट व बफर झोनमध्ये लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने पार्ट्या करणे याचा आहे. हा गुन्हा आहे या पार्टीत करोना टेस्टसाठी स्वब घेतलेला पदाधिकारी हजर राहतो. उद्या काही दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण? तुमचा हा दोष नाही का? सांगा ना गुन्हा दाखल करायला असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी केला आहे.

अकोलेचे आमदार किरण लहामटे यांनी सोशल मिडीयावर मुलाखत टाकून खुलासा केला. त्याला अनुसरून भांगरे बोलत होते. लोकप्रतिनिधी कायदा पाळण्यासाठी व त्याचं पालन करून घेण्यासाठी असतात. मात्र हे लोकप्रतिनिधी कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी कायदा पायदळी तुडवित आहे.

स्वतः लोकप्रतिनिधी असताना तुम्ही अकोले तालुक्यात दोन नंबरचे धंदे चालू आहे, हे मान्य करतात आणि त्यांचे विरोधात आपण कर्दनकाळ असलेचेही सांगता. मग तकारवाई करण्यासाठी तुम्हाला कोणी अडविले का? फक्त जनतेला भुलवण्यासाठी पोकळ बाता आपण मारीत आहात.

तालुक्यातील विरोधी पक्ष म्हणून जनतेचे प्रश्न मांडण्याची आमची जबाबदारी आहे. तुम्ही जेथे चुकाल तेथे तुमच्यावर टिका करणारच, आपण दमदाटी करून विरोधकांचा आवाज दाबू शकत नाही. आणि तुमच्याच भाषेत सांगतो, आमच्यासारख्या व आमच्या कार्यकर्त्यांना दम देऊन बघा याचे उत्तर आम्ही जशास तसे देऊ.

तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेल्या गोपनीयतेच्या शपथेचे उल्लंघन करीत आहात. विरोधकांना दमबाजी करण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे काय ? असा सवाल भांगरे यांनी विचारला.

काळेवाडीचे लग्न प्रकरण क्वारंटाईन केलेले तुमचे कार्यकर्ते पसार झाले. म्हणून प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तुम्ही म्हणता की, प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले आहे. प्रशासन हे तुमच्या सरकारचा भाग आहे, मग तुमचे सरकार लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतेय काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. आणि गुन्हे जर खरे असेल तर तुम्ही आरोपींना पाठीशी घालतात हेही तितकेच सत्य आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com