पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, याविषयी...

पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, याविषयी...

मुंबई | Mumbai

नुकताच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता....

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. "त्यावेळी मी स्वत: म्हटलेले होते की तो विषय मी कदापि काढणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. तसंच आपण उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याची कोणतीही चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. ते जालन्यात बोलत होते.

याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावर भाष्य करण्याचे टाळले. पहाटेच्या शपथविधीचा विषय मी कदापिही काढणार नाही, असे त्यांनी स्पष्टच सांगितले.

पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, याविषयी...
भुसावळमध्ये भूकंपाचे धक्के, परिसरात भीतीचे वातावरण

देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी मला अडकवण्याचे टार्गेट तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आले होते, असा आरोप केला होता. त्यासंदर्भात आशिष शेलार यांनी संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.

यावर अजित पवार म्हणाले की, इतर कोण काय म्हणतेय, त्यावर उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाही. कुणीही कोड्यात बोलू नये. स्पष्ट भूमिका घेतली, तर त्यावर लोकांना नीट काहीतरी कळेल. मी उपमुख्यमंत्री असताना अशा प्रकारची कोणतीही चर्चा माझ्या स्तरावर झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहाटेच्या शपथविधीबाबत जयंत पाटलांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, याविषयी...
कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com