Monday, April 29, 2024
Homeराजकीयअजित पवारांचा नवा घोटाळा बाहेर काढणार- भाजप नेते किरीट सोमय्या यांचा...

अजित पवारांचा नवा घोटाळा बाहेर काढणार- भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांच्याशी संबंधित कंपन्या, साखर कारखाने तसेच निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी Income tax department raids पडलेल्या असतानाच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या Former BJP MP Kirit Somaiya यांनी रविवारी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला. हा घोटाळा पाच हजार कोटीचा असून येत्या बुधवारी त्याचा भांडाफोड करणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले.

- Advertisement -

जरंडेश्वर साखर कारखान्याचा Jarandeshwar Sugar Factory मालक कोण आहे? हे अजित पवार यांनी सांगावे. या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार,असे सोमय्या यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

बुधवारी मी पुण्यात जाणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची पोलखोल करणार आहे. यांनी इतके घोटाळे केले आहेत, इतकी लूट माजवली आहे की मोजदाद करणे अवघड आहे. पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून छापे सुरू आहेत. हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा आहे. त्यांना तुरुंगात जावेच लागेल. आपल्यावर कारवाई होईल असे आघाडीच्या नेत्यांना स्वप्नातही वाटले नसेल. पण मोदींनी कारवाई करून दाखवल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

अजित पवार, हसन मुश्रीफ, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत, हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही, असेही सोमय्या म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या