दिल्लीतल्या मानपान नाट्यावर अजित पवारांचा खुलासा, म्हणाले...

Ajit Pawar
Ajit Pawar

मुंबई l Mumbai

रविवारी दिल्लीत दोन वर्षांच्या कालावधीनंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या (NCP) राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अजित पवार (Ajit Pawar) कार्यक्रम अर्धवट सोडून बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.

राष्ट्रावादीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र, यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नाराज नाही, असं म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय. “कुणीही बोलू नका असं मला सांगितलं नव्हतं. तर तिथं वरिष्ठ नेते होते. त्यामुळे मी बोललो नाही. मी स्वत:हून बोलणं टाळलं”, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, पक्षाने मला उपमुख्यमंत्रिपद दिले, विरोधी पक्षनेतेपद दिले. मी नाराज कशाला होऊ? राष्ट्रवादीने मला कधी डावललं नाही. मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोला असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांसमोर आहे. मी २१ वर्षात राष्ट्रीय पातळीवर जातो परंतु कुठे भाष्य करत नाही. राज्यात अधिवेशन असलं, कार्यक्रम असलं तर मी भाषण करतो. तुमचे गैरसमज दूर करून राज्यासमोरील प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे असं त्यांनी म्हटलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com