नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “काहीही फालतू...”

नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “काहीही फालतू...”

पुणे | Pune

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या आठवड्यापासून नॉट रिचेबल आहेत अशा बातम्या येत होत्या. गेल्या काही दिवसांपासून ते कार्यक्रमांमध्ये उपस्थित दिसत नसल्याने अशा चर्चा होत होत्या.

शिंदे गटातील नेते, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) आक्रमक झाला होता. सर्व नेते सत्तारांवर टीका करत होते. मात्र यावेळी अजित पवार गप्प होते. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादीच्या शिर्डी येथील मेळाव्यानंतर ते नॉट रीचेबल होते. दरम्यान अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांसमोर आले.

'मी चार तारखेला बाहेरगावी गेलो होता. चार तारखेला रात्री उशीरा गेलो. १० ला रात्री आलो. माहिती घ्यायची नाही आणि वेगवेगळ्या चॅनेलवर काहीही सुरु आहे. अजित पवार कुठे गेले हे कुणीतरी माझ्या ऑफिसला विचारायला हवं होतं. जो माणूस परदेशात जातो तो लगेचच याबाबत बोलू शकत नाही. मी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य करेन. कारण नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मी कुठल्याही गोष्टीला सामोरा जाणार माणूस आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे,' असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी यावेळी ‘भारत जोडो’ यात्रेवरही भाष्य केलं. 'भारत जोडो यात्रेला पहिल्यापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा संपल्यानंतर हे वातावरण टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. अनेकदा चांगल्या पद्दतीने गोष्टी होतात आणि दोन महिन्यात लोक विसरुन जातात. असं होता कामा नये,' असं अजित पवारांनी सांगितलं.

ओला दुष्काळ जाहीर न कऱण्यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. 'दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा असं सरकारला सागितलं होतं. पण दोघांनीही ते अजून केलं नाही. खरीपसह रब्बीचंही नुकसान झालं. विम्याचे पैसेही मिळत नाहीत. त्याचे मोठे आकडे पाहायला मिळतात, पण तुटपुंजी रक्कम देतात. त्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष दिलं पाहिजे,' अशी मागणी अजित पवारांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com