Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!; अजित पवारांनी शरद पवारांसमोर...

सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!; अजित पवारांनी शरद पवारांसमोर दटावले

मुंबई | Mumbai

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली.

- Advertisement -

पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसार पुढचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वेगळेच दृष्य पाहायला मिळाले. शेकडोच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पवारांना भावनिक साद घालत पवार यांना त्यांचा निर्णय मागे घेण्याविषयी सांगितले. कित्येक कार्यकर्त्यांना रडू आले.

शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा… कोण होणार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष…?

या दरम्यान अजित पवारांनी गोंधळ करत असलेल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना गप्प बसण्याचं आवाहन केलं. तरीदेखील नेते, कार्यकर्ते शांत होताना दिसत नव्हते. अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या सर्व नेत्यांनी विनंती करूनही त्यांनी हा निर्णय मागे न घेतल्यामुळे कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना शरद पवारांची समजूत घालावी अशी विनंती केली. त्यावर ‘सुप्रिया तू बोलू नको’, असं अजित पवार म्हणाले.

“मिशा काढा अन्यथा हजामत करायला…”; संजय राऊतांचा संतोष बांगरांवर निशाणा

कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना शरद पवार यांना निर्णय मागे घ्या असं सांगा असं म्हणत असतानाच अजित पवार म्हणाले की, अजित पवारांचं बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. सुप्रिया सुळेही समोर बसून सर्व पाहात होत्या. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय, असं सुप्रिया सुळेंना सांगितलं.

भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण तवाच फिरवला; पवारांच्या निर्णयानंतर राऊतांचं ट्विट

- Advertisment -

ताज्या बातम्या