Saturday, April 27, 2024
Homeराजकीयतर एक दिवसाचे खास अधिवेशन बोलवू - अजित पवार

तर एक दिवसाचे खास अधिवेशन बोलवू – अजित पवार

पुणे |प्रतिनिधि| pune

मराठा आरक्षणाबाबत जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनात विषय घेऊ किंवा गरज पडल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात येईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. केंद्राने मराठा आरक्षणाचा कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा असे आमचे म्हणणे असून गरज पडल्यास कोरोनाचे संकट ओसरल्यावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आणि विरोधकांचे एक शिष्ट मंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटण्याची मानसिकता आघाडी सरकारची असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

अजित पवार यांनी शुक्रवारी कोरोना आढावा बैठक घेतली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

पवार म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज सरकारचे काही ही चुकलेले नाही, न्यायालयाने जरी निर्णय दिला असला तरी केंद्र आणि राष्ट्रपती मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ शकतात. मात्र, काहीजण राजकारण करत आहेत, चुकीच्या बातम्या पसरवल्या जाता आहेत त्याला अर्थ नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्का देणारा आहे. मात्र इतर वर्गावर अन्याय न होऊ देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे शहरात लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील

पुणे शहरात लॉक डाऊन बाबत उच्च न्यायालयाने सरकारला सूचना केल्या आहेत या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लॉक डाऊन लागणार का याची चर्चा असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉक डाऊन करायचा की नाही याबाबत मी बोलणार नाही, त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगितले. मात्र, सध्याच्या परिस्थिती बाबत आढावा घेताना काही बाबी निदर्शनास येत असल्याचे अजित पवार म्हणाले.

बैठकीत, लॉकडाउनची गरज असल्याचे काही लोकप्रतिनिधींनी करण्याची सांगितलं आहे तर सकाळी काही दुकाने उघडी असतात त्यामुळे लोक वेगवेगळी कारणं देत बाहेर पडतात त्यांना रोखायचे कसे अशी अडचण पोलिसांनी बोलून दाखवली. दुसरीकडे सध्या सुरू आहे तशाच पद्धतीने नियम चालू ठेवून अधिक कडक निर्बंध करावेत अशा सूचना दिल्या आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी करता आली परिणाम चांगले दिसतील असे देखील वाटत असल्याच अजित पवार यावेळी म्हणाले.

पुढील काळासाठी नियोजन….

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल असे अनेक जण सांगतात. त्यामुळे सरकार त्याला तोंड देण्यासाठी प्रयत्न करत असून ऑक्सिजन प्लांट निर्मितीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना संसर्ग लहान मुलांमध्ये देखील आढळू शकतो ही शक्यता गृहीत धरून लहान मुलांसाठी पुण्यातील राजीव गांधी रुग्णालय राखीव करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे अजित पवार म्हणाले.

लस उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत…

आज लसीकरण अनेक ठिकाणी ठप्प आहे. नागरिकांना लस उपलब्ध होत नाही, ही स्थिती आहे. मात्र, सुरवातीलाच भारताने लस बाहेर द्यायला नको होती , रशियाने जसे त्यांचे लसीकरण झाल्यावर इतरांना लस दिली तसे आपण केले नाहीआपल्याकडे अत्यंत चुकीचा निर्णय झाल , बाहेर द्यायची अजिबात आवश्यकता नव्हती , नियोजन करायला हवं होते असे सांगत पुरवठा नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र,राज्य सरकारचे लस उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहेत,आपण स्वतःअदर पुनवाला यांना फोन लावला होता,

ते अजून तरी दहा बारा दिवस भारतात येणार नाही त्यामुळे त्यांना परदेशात संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे असे अजित पवार म्हणाले. तसेच परदेशातील लस खरेदी करायला केंद्राने परवानगी द्यावी असे ही अजित पवार म्हणाले

काकडेंची विश्वासहर्ता आहे का….

दरम्यान आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजपचे राज्य उपाध्यक्ष संजय काकडे यांच्यावर अजित पवारांनी टीका केली, ज्या व्यक्ती बद्दल विचारताय त्यांची विश्वासाहर्ता काय, संजय काकडे यांची विश्वासार्हता नाही त्यांच्या बद्दल काय बोलणार असे अजित पवार म्हणाले

आमदार निवास गरजेचे…

आमदार निवास बांधकामावरून विरोधी पक्ष टीका करत आहेत यावर बोलताना या नूतनीकरणसाठी भाजपच्या काळात पाडले होते, आता आमदारांना निवासस्थान नसल्याने ते बांधायचं काम करतो आहोत, दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानासाठी किती खर्च करताय, उलट आमदार निवास नसल्याने आमदारांच्या राहण्यावर खर्च करावाच लागतो आहे, त्यामुळे हे काम गरजेचे आहे असे अजित पवार म्हणाले…

बाळासाहेब थोरात नोंद घेतील…

संगमनेरमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर बोलताना, राज्यात अपवाद वगळता सगळं व्यवस्थित सुरू आहे, समजावून सांगितलं तर नागरिक ऐकतात असा आजवरचा अनुभव आहे. मात्र,हाताची सगळी बोट सारखेच नसतात,तसेच काही संगमनेर मध्ये झालेले दिसते. त्याबाबत काँग्रेसनेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात अनेक वर्षे तिथे नेतृत्व करतात त्यामुळे याबाबत ते नोंद घेतील असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या