Friday, April 26, 2024
Homeराजकीयनिलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे - अजित पवार

निलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – अजित पवार

पुणे |Pune

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत तर

- Advertisement -

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यावरून राजकीय आरोप –प्रत्यारोप सुरु झाले आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनीही यामध्ये उडी घेत ट्वीटद्वारे राष्ट्रावादी कॉंग्रेसवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असे त्यांनी ट्वीत केले होते. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात विचारले असता त्यांनी संतापून निलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी या पक्षात आहेत.

या केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी त्यांना छेडले असता पवार चांगलेच संतापले. पवार म्हणाले, ते वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या