Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराष्ट्रवादीत काय होतंय हे सर्वांना माहित, अजितदादांनी आमच्यासोबत यावं; मंत्री केसरकरांची खुली...

राष्ट्रवादीत काय होतंय हे सर्वांना माहित, अजितदादांनी आमच्यासोबत यावं; मंत्री केसरकरांची खुली ऑफर

शिर्डी | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष, नेते कंबर कसून तयारीला लागले आहेत. विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार यांनी आमच्यासोबत यावे, अशी खुली ऑफर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. ते शिर्डीत बोलत होते.

- Advertisement -

केसरकर म्हणाले, दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहित आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे. संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्याने घेते. अजित पवार कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावं. अशी खुली ऑफर केसरकर यांनी अजित पवार यांना दिली.

Manipur Violence : मणिपूर धगधगतंच! केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं, सुरक्षारक्षक बघत राहिले, कारण…

तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर देखील टीकास्त्र सोडलं. आपल्याच माणसाला धमकी द्यायला लावतात. ही कशी लोक आहेत, यांचे बुरखे आपोआप फाटले ‌जात आहेत. ते किती घाणेरड बोलतात हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांच्या पक्षाने नवीन काहीतरी चॅनल सुरु केले आहे. त्यात राऊतांना घेतले नाही. सुषमा अंधारे यांना घेतले आहे. त्या बाळासाहेबांबद्दल काय बोलल्या अन् त्यांना प्रवक्ता केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. त्यांनी ते विचार सोडले, अशा शब्दात केसरकर यांनी टीकास्त्र सोडले.

तसेच, आदित्य ठाकरेंना कोणी अधिकार दिला खोके घेतले म्हणण्याचा? कोर्टाने नोटीस ‌दिली तेथे जाऊन उत्तर द्या. पैशांनी कोणी विकल जात नाही. ते खोट बोलतात, बाळासाहेब नेहमी खर बोलायचे. तरुण असून तुम्ही मंत्रालयात जात नव्हता. पर्यटनमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी कोकणासाठी काय केले? लोकांना भडकावून पोळी भाजून घ्यायची. एकनाथ शिंदे गरजवंताना मदत करणारे आहेत. जे बाळासाहेब करायचे ते शिवसैनिक करत आहेत. पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंना जवळ घ्यायला तयार होते अन् तुम्ही खोट बोलत फिरत आहात, या शब्दांत दीपक केसरकर यांनी हल्लाबोल केला.

Video : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री ED च्या कचाट्यात, बेड्या पडताच ढसाढसा रडले… नेमकं प्रकरण काय?

यावेळी त्यांनी जाहिरातीच्या मुद्द्यावरूनही केसरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. जाहिरातीचे पैसे चेकने दिले. ते स्वत: देवू शकतात. किती दिवस घाणेरडी भाषा वापरत राहणार?, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावरही टीका केली. स्वत:च्या मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हणणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात त्यांनी बोंडे यांना सुनावले. अनिल बोंडे यांनी आपल वक्तव्य मागे घेतलं. त्यांनी माणुसकी दाखवली, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही किती काम केल आणि शिंदेनी किती काम केल हे जनतेला समजू द्या, असं आव्हानच त्यांनी महाविकास आघाडीला यावेळी दिलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या