Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या“उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, पण...”; शिंदे गटाच्या बंडाबाबत अजित पवारांचा मोठा...

“उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, पण…”; शिंदे गटाच्या बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून (Shivsena) उठाव केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेचं शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) अशा दोन गटांमध्ये विभाजन झालं.

- Advertisement -

शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यावर प्रतिक्रिया देताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

विजयानंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…!”

‘शिवसेनेत जी फूट पडली आहे ती फूट पडण्यापूर्वीच या सर्व गोष्टींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. स्वत: शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या होत्या. मात्र पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिथेच खरी गफलत झाल्याचे’, अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.

अजित पवार पुढे म्हणाले, ‘मी स्वत: यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सावध केलं होतं. मात्र त्यावेळी ते बलले की, हा आमच्या पक्षातील अंतर्गत मामला आहे. मी बोलेल एकनाथ शिंदे यांच्यासोबत, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आणि अखेर जे व्हायला नको होते तेच झालं. शिवसेनेत फूट पडली.’

राणेंच्या अडचणी वाढणार? राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस

दरम्यान यावेळी अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजीत यांना उमेदवारी द्या असं स्वत: पवार साहेबांनी मल्लिकार्जून खर्गेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली. असो आताही काँग्रेसनं फार ताणून धरू नये, आणि सत्यजीत यांना पुन्हा सोबत घ्यावं असं मला वाटतं पण अंतिम निर्णय हा सत्यजित हेच घेतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Accident news : कार-बसचा भीषण अपघात, महिलेसह चौघांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या