“लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग…”; पोटनिवडणुकीच्या चर्चेवरून अजित पवार संतापले

jalgaon-digital
2 Min Read

पुणे | Pune

पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोटनिवडणूक बिनविरोध होणार का अशा चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने वेगळी भूमिका घेत निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत.

बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना चांगलंच सुनावणं आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ तीन दिवस झाली आहेत.

इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव

घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधानं केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही, पण मनाची लाज वाटते की नाही, असं लोकं म्हणतील, असं अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार यांनी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनाही सुनावले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अनेकांना फोन केले होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला होता. त्याबद्दल विचारणा झाल्यावर अजित पवार म्हणाले की, ‘ कोण नरेश म्हस्के? मी त्याला ओळखत नाही’, असा पवित्रा घेत अजित पवार यांनी या विषयावर फार बोलणे टाळले.

‘ती’ चूक जीवावर बेतली! डासांना मारणाऱ्या कॉईलमुळे एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

तसेच त्यांनी यावेळी बोलताना संभाजीनगरमधील राड्यावरही प्रतिक्रिया दिली. संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. माझं संभाजीनगरमधील नागरिकांना सांगणं आहे, की कोणी जर तुमची माथी भडकवण्याचा प्रयत्न करत असले, तर त्याला थारा देऊ नका, असं ते म्हणाले.

“मविआची सभा होऊ नये यासाठी…”; छ. संभाजीनगरमधील राड्यावरून राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र

तसेच महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबरोबरच सभेदरम्यान संभाजीनगरमधील वातावरण बिघडेल, असं विधान कोणी करू नये, असे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *