राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंना अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंना अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई | Mumbai

राज्यात भंडारा (Bhandara) आणि गोंदिया (GOndiya) या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम १० मे रोजी पार पडला. गोंदियामध्ये भाजपला (BJP) राष्ट्रवादीने (NCP) मदत केल्याने काँग्रेस (Congress) एकटी पडली. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित जाऊ शकले नाहीत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका केली. त्यांच्या याच टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार म्हणाले की, 'नाना पटोले यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. त्यांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही. पाठीत खंजीर खुपसण्यासारखे वक्तव्य आम्ही करत नाही.' तसेच 'राजकारणाबाबतच बोलायचे तर नाना पटोले पुर्वी भाजपमध्ये होते. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे भाजपनेही नाना पटोले यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हणायचे का?,' असा सवाल अजित पवार यांनी केला.

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, 'राज्य स्तरावर वेगळे निर्णय असतात मात्र स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होतं असतात. काँग्रेसला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसाच आम्हाला देखील पक्ष वाढवण्याच्या अधिकार आहे. राज्यस्तरावर आमची शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यामधे त्यांनी देखील आम्हाला हेच सांगितलं आहे.'

Related Stories

No stories found.