Thursday, April 25, 2024
Homeराजकीय“लोकप्रतिनिधी असले तरीही....”; अजित पवारांचा खा.विखेंना टोला

“लोकप्रतिनिधी असले तरीही….”; अजित पवारांचा खा.विखेंना टोला

मुंबई | Mumbai

सध्या सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी धावाधाव सुरू असतानाच खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी मात्र आपल्या जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणली.

- Advertisement -

तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: सोशल मीडियात स्वत:च तसा एक व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना खा.डॉ. सुजय विखे यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

अजित पवार बोलतांना म्हणाले की, ‘लोकप्रतिनिधी असले तरीही रेमडेसिवीर या औषधाचा साठा करणे अयोग्य असून खा. शरद पवार साहेब यांनी देखील अनेक जिल्ह्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. मात्र हे करताना त्यांनी जिल्हाधिकारी किंवा शहरांच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे रेमडेसिवीर सुपूर्द केले. प्रशासन जी यंत्रणा राबवते त्यांच्याकडे ही गोष्ट देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सुजय विखे यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सत्ताधारी किंवा विरोधक कोणीही असले तरी सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच ते जनतेच्या हिताचे आहे का हे तपासून पुढील निर्णय घ्यावे,’ असे पवार यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुजय विखेंचा व्हिडिओ संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही शंका उपस्थित केली आहे. खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे. एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिवीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी, असं आव्हानच चाकणकर यांनी दिलं आहे.

खासदार विखेंनी असे आणले होते रेमडेसिवीर…

त्यामुळे सुजय यांनी आणलेल्या बॉक्समध्ये खरोखरच इंजेक्शन होते का? सुजय विखेंनी व्हायरल केलेला व्हिडीओ खरा होता का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, विखे यांनी गेल्या सोमवारी (19 एप्रिल) विमानाने हा साठा आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा उतरविला. तो कोठून आणला व किती इंजेक्शन आणली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

काय म्हणाले होते सुजय विखे?

विखे यांनी व्हिडिओत म्हटले आहे, मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही मदत घेतली. हे करत असताना गरिबांसाठी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या