Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : राष्ट्रवादीत आता डिजिटल वॉर? अजित पवार गटाचं X (ट्विटर)...

NCP Crisis : राष्ट्रवादीत आता डिजिटल वॉर? अजित पवार गटाचं X (ट्विटर) अकाउंट सस्पेंड, कारवाईचं कारणही समोर

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. शिवाय या दोन्ही गटांचे सोशल मीडियावरील अकाऊंट देखील वेगळे आहेत. NCPSpeaks हे राष्ट्रवादी काँग्रेसचं (शरद पवार गट) अधिकृत X (ट्विटर) आहे.

- Advertisement -

तर अजित पवार गटाकडून ट्विटरचे एक नवीन अकाऊंट NCPspeaks_official असे तयार करण्यात आले होते. मात्र आता ट्विटरने हे अकाऊंट सस्पेंड केले आहे. शरद पवार गटाकडून या ट्विटर हँडलवर दावा केल्यानंतर आणि तक्रारीनंतर ते निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पक्षांचे ट्विटर अकाउंट आणि बायो सारखेच असल्याने अजित पवार गटाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते आहे.

दुसरीकडे अजित पवार यांनी २ जुलै रोजी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर अजित पवार गटाने सुनिल तटकरे यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या