पुणे |प्रतिनिधी| Pune

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपा संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आरोप करणाऱ्या महिलेसंदर्भात भाजपाचे उपाध्यक्ष व मनसेचे एक नेते व एयर लाईन मधील एका व्यक्तीने आरोप केले आहेत.त्यामुळे पोलिस प्रशासनाने सदर प्रकरणी योग्य तो तपास करून सत्यता पुढे आल्यानंतर योग्य ते निर्णय घेतला जाईल,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बारामती येथील शारदानगर कृषीविज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीला मिळणार यश...

महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्यांदाच पार पडल्या. या निवडणुकात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. विशेषता कर्जत जामखेड येथील माजीमंत्री राम शिंदे यांच्या गावातील ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीने जिंकल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व जबाबदारी त्या त्या भागातील स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी चांगले काम करून यश संपादन केले आहे. त्या सर्वांचे पवार यांनी कौतुक करून त्यांची जी कामे असतील ते पूर्ण करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

भिन्न विचार असले तरी त्यातून मार्ग निघू शकतो...

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसमध्ये मतांतर असल्याबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगळी आहे मात्र सत्तास्थापन करीत असताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅम याबाबत तिन्ही पक्षांचे एक मत आहे. नामांतरवरून भिन्न विचार असले तरी त्यातून मार्ग काढता येऊ शकतो असे उत्तर पवार यांनी दिली.

लाखाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा हा अपमान..

दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबत पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही आस्था नसून केंद्राला स्वारस्य नसल्याचे दिसत आहे. लाखाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा हा अपमान आहे. असे पवार यांनी यावेळी सांगितले.