Friday, April 26, 2024
Homeराजकीयशरद पवार म्हणाले, अजितदादा नाराज आहेत, अरे...

शरद पवार म्हणाले, अजितदादा नाराज आहेत, अरे…

मुंबई –

माध्यमांनी अजितदादा नाराज असल्याच्या बातम्या चालवल्या मात्र तसे काहीही नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी

- Advertisement -

स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

40 वर्षानंतर भाजपातून आलेल्या खडसे यांचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं. मात्र, दुसरीकडे खडसे यांच्या प्रवेशावर काही नेते नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. या चर्चेला शरद पवार यांनी आज पूर्णविराम दिला.

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा त्यांच्या प्रवेश करण्याच्या निर्णयापासून सुरू झाली होती. यात राज्य मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याची चर्चाही सुरू होती. राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेला शरद पवार यांनी पूर्णविराम दिला.

ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसे यांच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काही तरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत. असं आहे की, करोनाच्या संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड व्हेटिंलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणार्‍या सहकार्‍यांना करोना झाला. त्यामुळे काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाही म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही.

खान्देश हा संपूर्ण परिसर गांधी-नेहरुंच्या विचाराचा होता. मध्यंतरी त्याला उतरती कळा लागली. या काळात नवी पिढी तयार झाली. ही पिढी घडवण्याचं काम नाथाभाऊंनी केलं. त्यांनी जिल्हा परिषद, खासदार, नगर परिषद, पंचायत समित्या आणल्या. इतिहासाचा हा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. नाथाभाऊ राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाला गती येईल. नाथाभाऊंनी खान्देशात पक्ष वाढवण्याचा शब्द दिला आहे. ते जेव्हा शब्द देतात, तेव्हा तो पूर्ण करतात. त्यावरून मागे हटत नाहीत. ही त्यांची खासियत आहे. आता करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण जळगावात जाणार असून, नाथाभाऊ काय चीज आहे हे दाखवून देणार आहोत, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या