Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यातुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलाय का?; अजित पवार कडाडले

तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलाय का?; अजित पवार कडाडले

शिवनेरी | Shivneri

आज सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती साजरी होत आहे. शिवनेरीवर (Shivneri) शिवजयंतीचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यासह मान्यवरांनी हजेरी लावली…

- Advertisement -

यावेळी एका तरुणाने मराठा आरक्षाणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या भाषणादरम्यान बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार चांगलेच संतापले. ते म्हणाले की, मी तुम्हाला आधी बोलू दिले. मात्र आता मध्ये बोलू नका, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कार्यक्रमात यानंतर काही वेळ गोंधळ झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या तरुणाला शांत करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमानंतर अजित पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण (Reservation) देऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

जय जिजाऊ, जय शिवराय! मोदींच्या मराठीत शुभेच्छा

या कायद्यात बदलाची गरज आहे. याबाबत तरुण सहकाऱ्यांनी मागणी केली. असे किती दिवस चालणार विचारले गेले. मात्र, आधीच्या आरक्षणाला (Reservation) धक्का न लागता कसे करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधानांना भेटून त्यांना सांगण्याचे काम उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली झालेले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या