Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामी दुधाचा व्यवसाय करणारा माणूस, आजही माझा गोठा आहे

मी दुधाचा व्यवसाय करणारा माणूस, आजही माझा गोठा आहे

बारामती | Baramati

मी दुधाचा धंदा करणारा माणूस आहे. आजही माझा गोठा आहे. आपण नवीन तंत्रज्ञान आणून गायींना 10 च्या 10 कालवडी होऊ शकतात असं तंत्रज्ञान आणले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे म्हटले आहे. बारामतीमधील पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस या वातानुकूलित नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

- Advertisement -

इथून पुढे तुमच्या 10 गायींना दहा कालवडी होणार

बारामतीमध्ये आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने प्रकल्प उभा केला आहे. त्यामध्ये तुमची गाई साधी असली तरी तिच्या गर्भाशयामध्ये उत्तम कालवड सोडण्यात येते. पूर्वीच्या काळी मी देखील दुधाचा व्यवसाय करणारा माणूस आहे. आजपण माझा काठेवाडीमध्ये गायींचा गोठा आहे. त्यावेळी दहा गाय व्यायल्या तर पाच कालवड आणि पाच खोंड व्हायच्या. निंबूकरांनो आता जगात चमत्कार झाला आहे. आपण ते तंत्रज्ञान इकडे आणले आहे. तुमची गाय कोणतीही असू त्याच्यामध्ये उत्तम दुभती कालवड सोडून ती त्याला जन्म देऊ शकते. त्यातून जास्त दूध देणारी गाय पुढे निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे इथून पुढे तुमच्या 10 गायींना दहा कालवडी होणार आहेत. अशा प्रमाणे त्यामध्ये क्रांती केली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

बारामतीला एक पळी जास्त वाढेन – अजित पवार

यावेळी मी निधी वाटपाच्या संदर्भात मुंबईत गेल्यावर आपल्या इथेही निधी देण्याचे काम करणार आहे. तुम्ही अजिबात शंका बाळगू नका. वाढत्या उंचीचा असल्याने आपल्या जवळच्या लोकांच्या ताटात जरा जास्तचं पडत असतं हे तुम्हाला माहितीच आहे. मी जेव्हा हे वाढपी म्हणून वाढणार आहे त्यावेळी सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न करेन. पण बारामती आणि निंबूला एक पळी जास्त वाढेन एवढी नोंद घ्यावी, असे अजित पवार म्हणाले.

तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे

बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना कानपिचक्या दिल्या. या कार्यक्रमात अजित पवार यांनी दत्तात्रेय भरणे यांना मिश्कीलपणे आपल्या पदाची आठवण करुन देताना तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे असल्याचे म्हटले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत, असे अजित पवार म्हणाले.

मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार, नाहीतर काय देणार **? असेही अजित पवार म्हणाले. यावर आता गाडी घसरायला लागलीय त्यामुळे थांबतो, असं म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या