सत्ताधार्‍यांना ‘शो’बाजीची हौस

अजित पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
सत्ताधार्‍यांना ‘शो’बाजीची हौस

श्रीगोंदा | Shrigonda

गणेश उत्सव (Ganesh Festival) हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे (Media) कॅमेरेसोबत घेऊन जात नाही. काही लोकांना ‘शो’ करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता राजकारणात तयार झाले आहेत, अशी टीका (Criticism) अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केली आहे.

शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना अजित पवार (AJit Pawar) म्हणाले की, दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात, ते सगळ्यांनी पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे (Congress MLA) आमदार फुटण्याच्या चर्चेसंदर्भात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील स्पष्ट केले की काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याशी त्यांची भेट झालेली नाही. सध्या मीडियाला कोणत्याही बातम्या नाहीत म्हणून अशा बातम्या दिल्या जात असल्याचे पवार म्हणाले. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत सध्या जे सुरू आहे ते लोकशाहीला धरून सुरू आहे का? याचा विचार व्हायला हवा असं अजित पवारांनी म्हटले आहे.

मग कळेल खरी सेना कोणाची

दसरा मेळाव्याबाबत बोलतना पवार म्हणाले, वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र, सध्या ज्या राजकीय घडामोडी घडल्या, ते सगळ्यांनी पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची? असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com