Monday, April 29, 2024
Homeराजकीयफडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर अजितदादांची एन्ट्री एन्ट्री होताच पडळकर दबक्या पावलांनी बाहेर, नेमकं...

फडणवीसांच्या ‘सागर’ बंगल्यावर अजितदादांची एन्ट्री एन्ट्री होताच पडळकर दबक्या पावलांनी बाहेर, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

गणेशोत्सवाचे पर्व सुरू असल्याने राजकीय मंडळीही एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचा आशीर्वाद घेतायत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘सागर’ बंगल्यावर गणेश दर्शनासाठी पोहोचले होते.

- Advertisement -

योगायोगाने याच वेळी सागर बंगल्यावर भाजपचे नेते गोपीचंद पडळकार हेही उपस्थित होते. अजित पवार आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. अजित पवार सागर बंगल्यावर येताच गोपीचंद पडळकर बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे आता ‘सागर’ निवासस्थानी घडलेल्या या राजकीय नाट्याची एकच चर्चा होत आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार गणपतीच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारी बंगल्यावर पोहोचले होते. याचवेळी तेथे गोपचंद पडळकर उपस्थित होते. अजित पवार आल्याचं कळताच गोपचंद पडळकर यांनी बंगल्याच्या बाहेर पडण्याचं ठरवलं. अजित पवार एका गेटने आत गेल्यानंतर पडळकर दुसऱ्या गेटमधून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.

माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण…

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद सुरू आहे. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याबद्दल बोलत असताना अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरली होती. त्यानंतर भाजप आणि अजित पवार गटामध्ये वाद निर्माण झाला होता. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेमुळे अजित पवारांनी त्यांच्यासोबत बोलण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. “अजित पवार यांच्याविषयी आमच्या मनात स्वच्छ भावना नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही अजित पवारांना मानत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढेही देखील देणार नाही”, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि अजित पवार गटात वाद झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या