Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'पठ्ठ्याचं (पडळकर) डिपॉझिट जप्त झालंय; कशाला एवढं महत्त्व देता? - अजित...

‘पठ्ठ्याचं (पडळकर) डिपॉझिट जप्त झालंय; कशाला एवढं महत्त्व देता? – अजित पवार

पुणे (प्रतिनिधि) –

पडळकरांना जनतेचा पाठिंबा आहे का? ज्यांचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची का एवढी नोंद घेता तुम्ही?, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी

- Advertisement -

विचारला. प्रमुख पक्षाचे तिकीट मिळून पठ्ठयाचे डिपॉझिट जप्त झाले त्यांच्यावर काय प्रश्न विचारता? लोकांनीच ज्यांना नाकारले आहे त्यांना इतके महत्त्व देण्याचे कारण नाही,’ असा टोला अजित पवार यांनी शुक्रवारी हाणला.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात सन 2021-22 या वर्षासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्हयाच्या नियोजनच्या प्रारूप आराखडय़ाबाबत बैठक घेण्यात आली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, पडळकरांचे हे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. ज्यांना लोकांनीच नाकारले आहे. त्यांना इतके महत्त्व देण्याचे कारण नाही.

विधानसभा अध्यक्षांबाता आधीच निर्णय झाला आहे. ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्याबाबत काही बदल करायचा असेल तर त्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते असलेले शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे घेतील, असेही त्यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. या निवडणुकांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळाचा नारा दिला त्यावर पवार म्हणाले, पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणतात की आम्ही निवडणून येणार आणि विरोधी पक्ष म्हणतो आम्ही खेचून घेणार, पण मी म्हणतो आम्ही खेचून घेणार, असा पलटवार पवार यांनी केला.

सध्या वादाचा मुद्दा ठरलेल्या वीजबिलांच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, वीजबिलसंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱयांकडे मोठी थकबाकी आहे. त्यावर व्याज आहे. त्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱयांची कर्जमाफी योजना बंद करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सिरमला आग शॉर्टसर्किटमुळे

काही दिवसांपूर्वी सिरम इन्स्टिटय़ूटला आग लागली होती. ही लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती, असा अहवाल आला असल्याचे पवार यांनी सांगितले.

पुरंदरच्या विमानतळाची फाईल केंद्राकडे

पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भातील शिफास फाईल ही केंदाकडे पाठविली आहे. त्यानंतर राजनाथ सिंग, शरद पवार यांच्यात बैठक झाली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यानंतर अभ्यास केला असता पहिल्या जागेपेक्षा दुसरी जागा उपयुक्त असल्याचे पवार यांनी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या