सिल्व्हर ओकचे दलाल कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत; अजय बोरस्तेंचा राऊतांना टोला

सिल्व्हर ओकचे दलाल कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला  माहीत; अजय बोरस्तेंचा राऊतांना टोला

मुंबई | Mumbai

नाशिकमधील शिंदे गटाने (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या 12 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला...

यावेळी प्रवेशकर्त्यांच्या वतीने अजय बोरस्ते म्हणाले की, नाशिकच्या विकासाला गेल्या काही काळापासून ब्रेक लागल्याचे दिसून येते. ही वस्तूस्थिती आहे. नाशिक हे सुवर्ण त्रिकोणाचे शहर आहे. जेव्हा खऱ्या अर्थाने युतीचे सरकार आहे. तेव्हापासून आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन होतो.

नाशिकमध्ये अपघात झाला तेव्हा मुख्यमंत्री तातडीने नाशकात दाखल झाले. सर्व ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले. अपघात स्थळावरचे अतिक्रमण तातडीने हटवण्यात आले. हे सर्व पाहून लक्षात आले की, महाराष्ट्र राज्याला एक संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत.

नाशिक शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी वारंवार बैठका घेत झटपट निर्णय घेतले. नाशिकवर मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे नाशिककरांचे देखील हे कर्तव्य आहे की, आपण त्यांना पाठबळ दिले पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे अजय बोरस्ते म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकच्या माजी नगरसेवकांच्या शिंदे गटातील प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली होती. शिंदे गटात जाणारे ते माजी नगरसेवक दलाल आहेत, असे ते म्हणाले होते.

बोरस्ते यांनी संजय राऊत यांचे नाव न घेतला त्यांना टोला लगावला आहे. बोरस्ते म्हणाले की, कोणीतरी आम्हाला दलाल म्हाणाले, पण महाराष्ट्रातील जनतेला माहितीये की सिल्व्हर ओकचे दलाल कोण आहेत. त्यामुळे उगीच आरोप करणे योग्य नाही. आम्ही कोणाबद्दल बोलत नाही. मात्र आम्हाला बोलायला भाग पाडू नका, असा इशारा त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com