Thursday, April 25, 2024
Homeराजकीयविखे-पवारांची मैत्री एक्सप्रेस; शिंदे म्हणताहेत, हा तर पवारांचा नैतिक पराभव

विखे-पवारांची मैत्री एक्सप्रेस; शिंदे म्हणताहेत, हा तर पवारांचा नैतिक पराभव

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेच्या राजकारणातून खा. डॉ. सुजय विखे-आ.रोहित पवार यांची मैत्री एक्सप्रेस सुरू झाल्याची चर्चा राजकीय वुर्तळात रंगली

- Advertisement -

असतानाच माजी मंत्री राम शिंदे यांनी हा पवारांचा नैतिक पराभव असल्याचे म्हटले आहे.

विखे-पवारांच्या या नव्या नगरी पॅटर्नमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून माजी मंत्री राम शिंदेंच्या प्रकरणात विखे पाटील भाजपलाही भारी भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश भोसले यांनी जिल्हा बँकेच्या मैदानातून माघार घेतल्याने माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भोसले यांच्या माघारीसाठी आ. पवार यांनी पुढाकार घेतला होता. विखे-पवारांच्या ऐनवेळीच्या छुप्या युतीने माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. या चर्चांवर फेसबुक पोस्ट लिहित प्रा. शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.

प्रा. शिंदे म्हणाले…!

जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांना तिकीट दिले होते. राष्ट्रवादीने सुरेश भोसले यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवाराला सुचक मिळाला नाही. राळेभात यांचा मुलगा अमोल राळेभात यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावर एकच सुचक होता. ज्यांच्या पक्षाला सुचक मिळाला नाही त्या पक्षाची अवस्था काय होती हे यावरून स्पष्ट होते. छाननीत राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज बाद झाला असताना आ. रोहीत पवार यांनी राजकीय दबाव आणून तो मंजूर करून घेतला. त्यामुळे आमच्या उमेदवारावर पडणारा गुलाल काही दिवस लांबला. निवडणूक झाली तर दारून पराभव होईल या भीतीने आ. रोहीत पवार यांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज माघे घेतला. हा त्यांचा नैतिक पराभव असून त्याची आता सुरूवात झाली असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या