“पंतप्रधानांना मित्रों आवाजाशिवाय...”; राहुल गांधींची टीका

“पंतप्रधानांना मित्रों आवाजाशिवाय...”; राहुल गांधींची टीका

दिल्ली | Delhi

अग्निपथ या सरकारच्या योजनेला (Agnipath scheme) जाहीर झाल्यापासूनच विरोध होतो आहे. योजनेविरोधात चांगलाच रोषही दिसून येतो आहे.

अनेक राज्यांमधले विद्यार्थी या योजनेविरोधात आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'अग्निपथ तरुणांनी नाकारले, कृषी कायदा शेतकऱ्यांनी नाकारला, नोटाबंदी अर्थतज्ञांनी नाकारली, जीएसटी व्यापाऱ्यांनी नाकारली. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर आरोप केला की, पंतप्रधानांना देशातील जनतेला काय हवे आहे हे समजत नाही. कारण त्यांना मित्रों आवाजाशिवाय काहीही ऐकू येत नाही.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com