Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याहिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर

हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर

अमरावती | Amravati

त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Amravati Violence) घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज रविवारी अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल होणार.

अमरावतीत झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्यांची फडणवीस भेट घेणार आहेत. तसेच, ते व्यापारी आणि अमरावतीच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्रकारांशी ते संवाद साधतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या