Saturday, April 27, 2024
Homeराजकीयस्थायीनंतर महापालिकेला ‘या’ निवडीचे वेध

स्थायीनंतर महापालिकेला ‘या’ निवडीचे वेध

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीनंतर पुन्हा एकदा ऑनलाईन महासभा बोलविण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर रोजी होणार्‍या या सभेत स्वीकृत नगरसेवक निवड होणार आहे.

- Advertisement -

पावणेदोन वर्षानंतर महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीचा दुसर्‍यांदा ‘गुरू-वार’चा मुर्हूत सत्ताधारी भाजपने काढला आहे. 1 ऑक्टोबरला स्वीकृत निवडीची ऑनलाईन महासभा बोलविण्यात आली आहे. सामाजिक कार्याच्या निकषात न बसल्याने रिजेक्ट झालेल्यांना राजकीय पक्ष पुन्हा पसंती की नव्या चेहर्‍यांना संधी देणार याची उत्सुकता लागून आहे. भावी नगरसेवकांनी ‘गुरू-वार’ची तयारी चालविली असल्याचे सूत्रांकडून समजते.

तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी शिफारस केलेल्यांची नावे अपात्र असल्याचे कारण जानेवारीतील सभेत रिजेक्ट केले होते. स्थायी समिती सभापती निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा स्वीकृतवरून महापालिकेचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वर्षभराने स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी जानेवारी 2020 मध्ये महसभा झाली होती. गटनेत्यांनी शिफारस केलेल्या भावी नगरसेवकांचे प्रस्ताव कलेक्टर तथा आयुक्त द्विवेदी यांनी तपासले. कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत भावी नगरसेवकांना रिजेक्ट केले होते. महासभेत त्यावरून बराच खल झाला, पण कलेक्टर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने भावी नगरसेवकांचे खटाटोप अपयशी ठरला. आता स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी पुन्हा एकदा महासभेला मुहूर्त मिळाला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, भाजपचे मालनताई ढोणे, शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे हे आयुक्तांकडे भावी नगरसेवकांची शिफारस करणार आहेत. त्यासाठीचे अर्ज नगरसचिव कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

गुरूवारी 1 ऑक्टोबरला स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महासभेचे आयोजन केले आहे. महापालिकेच्या सभागृहात ऑनलाईन पध्दतीने ही सभा होणार आहे. गटनेत्यांनी त्यापूर्वीच स्वीकृतांच्या नावांची शिफारस आयुक्तांकडे करावयाची असून आयुक्त त्याची तपासणी करतील. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची शिफारस महासभेकडे करतील. महापौर तथा पीठासीन अधिकारी त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी ही प्रक्रिया असणार आहे.

गतवेळी रिजेक्ट झालेले स्वीकृत

राष्ट्रवादी- बाबासाहेब गाडळकर (दिवंगत), विपुल शेटिया

शिवसेना- संग्राम शेळके, मदन आढाव

भाजप- रामदास आंधळे

कोणाचे किती स्वीकृत

शिवसेना 2

राष्ट्रवादी 2

भाजप 1

तेच ते की नव्यांना संधी

प्राभारी आयुक्त असलेल्या कलेक्टरांनी त्यावेळी अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली होती. भावी नगरसेवकांनी ज्या सामाजिक संस्थांची नावे दिली होती त्यात अनेक त्रुटी निघाल्या. त्यामुळे सामाजिक कार्यावर प्रश्नचिन्हा निर्माण झाले, परिणामी त्या भावांची शिफारसच कलेक्टरांनी केली नव्हती. कारण ते सगळेच अपात्र ठरत होते.आता राजकीय पक्ष पुन्हा त्याच उमेदवारांना संधी देतात की नव्या नावाची शिफारस करून स्वीकृतांची संधी देणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या