Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअसेही राजकीय दृश्य : तासाभरापुर्वी एकमेकांवर तिखट टीका अन नंतर रंगल्या दिलखुलास...

असेही राजकीय दृश्य : तासाभरापुर्वी एकमेकांवर तिखट टीका अन नंतर रंगल्या दिलखुलास गप्पा

एरवी राज्यातील सत्ता स्थापना आणि खुर्चीवरून कायम एकमेकांवर टीका-टिप्पणी करणारे शिवसेना नेते संजय राऊत(sanjay raut), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)आणि राष्ट्रवादीचे नेते व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ शनिवारी (दि.२०) एकाच सोफ्यावर विराजमान झाल्याचे दृश्य सर्वांना पाहावयास मिळाले. त्यापुर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये कृषी कायद्यावरुन (new agriculture bill)जंुपली होती. राऊत म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांनी शोकसभा घ्यावी’ त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘मी त्यांचं डोकं तपासेल’ असे उत्तर दिलं. या तिखट प्रतिक्रियांनंतर हे शाब्दिक हल्ले वाढतील असं वाटत असतानाच संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील एकाच कार्यक्रमात आणि एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले. यावेळी दोघे एकमेकांशी अगदी दिलखुलासपणे हसत बोलत होते.

आमदार देवयानी फरांदे (devyani farande)यांच्या मुलीच्या लग्नात (marriage ceremony)सर्व पक्षीय मेळावा भरला होता. लग्नस्थळी जाण्यापूर्वीच राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर तसेच शेतकरी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयावर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवरही उपरोधितपणे टीका केली. अन् लगेचच लग्नाच्या मंडपात प्रवेश करताच तेथे चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ हे दोन्ही ज्या सोफ्यावर होते, तेथेच राऊत भुजबळांच्या शेजारी जाऊन बसले. तेथे पाटील अन् राऊत यांच्यातच गप्पा रंगल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे भाजपचे नेतेही यावेळी हजर होते.

- Advertisement -

हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊत म्हणाले, मी आता चंद्रकांत पाटलांनी शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.” खासदार संजय राऊत यांनी सकाळी सिडकोतील कार्यक्रमात भाजपचा करेक्ट कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी करण्यात आला, असे सांगत खिजविले.

तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “संजय राऊत सार्वजनिक बोलले, मात्र मी समोर असताना बोलले नाहीत. संजय राऊत डॉक्टर आहेत. त्यामुळे मी वेगळा डॉक्टर न शोधता त्यांच्याकडेच जातो म्हणजे आमचा जरा संवाद देखील होईल. नवाब मलिक, संजय राऊत काहीही संदर्भ नसलेल खोट का बोलत आहात, असा संवाद यावेळी करता येईल. यावेळी संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल.”

- Advertisment -

ताज्या बातम्या