भाजप-शिवसेनेचा संघर्ष पोहचला दिल्लीत! केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर किरीट सोमय्यांचे 'सूचक' विधान

भाजप-शिवसेनेचा संघर्ष पोहचला दिल्लीत! केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर किरीट सोमय्यांचे 'सूचक' विधान

दिल्ली | Delhi

शिवसैनिकांनी शनिवारी रात्री भाजप ((BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने आज दिल्लीत (Delhi) केंद्रीय गृहसचिव (Union Home Secretary) अजय कुमार भल्ला (Ajay Kumar Bhalla) यांची भेट घेतली. या भेटीनंतर किरीट सोमय्यांनी 'सूचक' विधान केलं आहे.

किरीट सोमय्या बोलतांना म्हणाले की, केंद्र सरकारचे गृह सचिव अजय भल्लांशी आमची सखोल चर्चा झाली. २० ते २५ मिनिटांच्या चर्चेत त्यांच्या चेहऱ्यावरही चिंता पाहायला मिळत होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं घटनेनं राज्य सरकारची जबाबदारी आहे. सामान्य नागरिक, प्रतिनिधींवर ज्या पद्धतीनं हल्ले होतायत, अत्याचार होत आहेत, धमकी दिली जात आहे, जिवंत गाडण्याची भाषा मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते करत आहेत. यासंदर्भात अजूनही तक्रारी इकडे आल्या आहेत.

तसेच, जेव्हा माझ्यावर हल्ला झाला, त्याची सर्व सीसीटीव्ही फोटो संजय पांडे यांनी गायब केले, पुण्यात झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फोटोज देखील आपण पोलिसांनी दिले होते, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचीही सखोल चौकशी करण्यात येईल. गरज पडल्यास पुढील एक दोन दिवसात केंद्राची टीम राज्यात येणार असल्याचे सोमय्या म्हणाले.

राज्यात संविधानाला पाळले जात नाही. कोणत्याही कायद्याचे राज्य सरकारकडून पालन होत नाही. वारंवार खोट्या केस दाखल केल्या जातात. त्यामद्ये आम्हाला टार्गेट केले जाते अशी माहितीही गृहसचिवांना दिली आहे. त्यावर गृहसचिवांनी एका अधिकाऱ्याला राज्यात पाठवून पुर्ण सखोल चौकशी केली जाईल असही सोमय्या बोलताना यावेळी म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.