Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजे गेले ते गद्दार, शिवसैनिक नव्हेच; आदित्य ठाकरे बंडखोरांवर बरसले

जे गेले ते गद्दार, शिवसैनिक नव्हेच; आदित्य ठाकरे बंडखोरांवर बरसले

ठाणे | Thane

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह आमदारांनी बंड केले. यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले….

- Advertisement -

अजूनही शिवसेनेतील (Shivsena) गळती थांबलेलीच नाही. एकापाठोपाठ एक नेते शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहेत. आमदारांनंतर आता खासदारही शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी सभांचा धडाका लावला आहे. आज भिवंडी येथे त्यांनी सभा घेतली. या सभेत बंडखोर आमदारांवर त्यांनी सडकून टीका केली आहे.

…अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

ते म्हणाले की, शिवसैनिकांची गर्दी हेच आमचे यश आहे. हे जे काही सुरु आहे ते क्लिष्ट आहे. ज्यांना आपण ओळख दिली, मंत्रिपद दिले ते आपल्याला सोडून गेले. ते योग्य आहे का? त्यांनी गद्दारी केली ते योग्य आहे का? राजकारणाची पातळी सोडायची नसते. ही माणूसकीशी झालेली गद्दारी आहे. मी लहानपणापासून ज्यांना पाहत आहे. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसले आहेत.

आरे कारशेडवरील बंदी उठवली, मेट्रोचा मार्ग मोकळा

तरीही आपली शिवसेना (Shivsena) हललेली नाही, ज्यांना अपचन झाले आहे तेच हललेत. त्यांच्यावर विश्वास टाकला, पण तुमच्यावर अन्याय झाला आणि तेच आता निष्ठावाण म्हणून पुढे येत आहेत. राजकारण जमले नाही म्हणून आज हे दिवस आले आहेत.

स्वतःच्या आमदारांवर पाळत आम्ही ठेवली नाही. जे गेले ते शिवसैनिक नव्हतेच. त्यांनी उठाव नाही तर गद्दारी केली आहे. या गद्दारांनी लोकांमध्ये फिरावे, म्हणजे लोकांची भावना त्यांना कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या