Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याचतुर्वेदींबाबत संजय शिरसाटांच्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

चतुर्वेदींबाबत संजय शिरसाटांच्या ‘त्या’ दाव्यावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई । Mumbai

शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा उल्लेख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात दावा केला आहे.

- Advertisement -

शिरसाट म्हणाले की, प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) शिवसेनेत आल्यावर त्यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. शिरसाटांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सडक्या विचारांचे लोक राजकारणात टिकले कसे? असा प्रश्न उपस्थित करत शिरसाटांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

गद्दारांना त्यांची किंमत कळली आहे. अशा सडक्या विचारांचे लोक साजकारणात टिकले कसे? असा प्रश्न उपस्थित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, याचं दु:ख परंतु जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी प्रकल्पांना विरोध करुन भांडवल केल्याचा आरोप शिरसाटांनी केला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, ज्यांना जेवढी किंमत आहे, तेवढीच देऊया. जास्त बोलून त्यांना मोठं करणे योग्य नाही. त्यांच्या गटाने त्यांना जिथे ठेवायचे आहे, तिथे ठेवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या