आदित्य ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले...

आदित्य ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर जोरदार पलटवार, म्हणाले...

मुंबई | Mumbai

एका कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी आपल्या अनोख्या शैलीत आज भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळालं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर भाषणातून निशाणा साधला. दरम्यान गुलाबराव पाटील यांच्या टीकेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, 'शिंदे गटाचे मंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात गोधडी शब्दाचा वापर केला होता. तेच हे कॉपी करत आहे.'

तसेच, 'एकच प्रश्न आहे, ३२ वर्षांच्या तरुणाने प्रश्न विचारायचे नाही का, माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला, शिवसेना का फोडली हे विचारायचं नाही का, चांगला माणूस मुख्यमंत्री झाला होता, त्याला पायउतार का करायला लावले हे आम्ही विचारायचं नाही का, ५० खोक्याचे काय झाले हे विचारू नये का?,' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

'तानाजी सावंत हे हाफकिन दलाल आहे असे म्हणतात,त्यांना माहीतच नाही हाफकिन कोण आहे आणि आता हे असे लोक एकत्र येत आहे. मनसे,भाजप, शिंदे गट कुणीही एकत्र येऊ दे जिंकणार शिवसेनेचा आहे,' असंही आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

गुलाबराव पाटील काय म्हणाले होते?

'शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होते आहे. म्हणते गेल्या ३५ वर्षात आम्ही काय केले, ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही.. जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते ३२ वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतोय. मात्र तू गोधडीत पण नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात गेलेले आमदारांवर टीका करणारे आदित्य ठाकरे यांचा जोरदार शब्दात समाचार घेतला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com