आधी आमदार, मग प्रकल्प अन् आता मंत्री गुजरातला पाठवले; आदित्य ठाकरेंची खोचक टीका

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

दिल्ली | Delhi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज पार पडणारी बैठक रद्द झाली. त्यावरुन राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मंत्रिमंडळ गुजरात विधानसभा निवडणुकीत व्यग्र आहेत. गुजरात निवडणुकीसाठी आजची मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली. त्यांचे प्रेम राज्यावर नाहीच. आगोदर आमदार पाठवले, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळच गुजरातला पाठवले, अशा शब्दात आदित्य (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

बिहार दौऱ्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मी आज बिहार दौऱ्यावर आहे. पाटणाला जाणार आहे. खासकरुन तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. मुख्य म्हणजे आम्ही एकाच वयाचो आहोत. त्यांचं काम योग्य रितीने चाललेलं आहे. अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. भेटीत राजकीय भूमिका नाही. अनेक दिवसांपासून आमच्यात फोनवरुन चर्चा सुरु होती. आम्ही सरकारमध्ये असताना ते बिहारमध्ये विरोधात होते. त्यावेळी सल्लामसलत होत असे. पहिल्यांदाच आमची प्रत्यक्षात भेट होणार आहे. तिसरी आघाडी यावर आता चर्चा करु नका. त्यावर मोठे नेते चर्चा करतील. ही भेट दोन तरुण नेत्यांमधील आहे."

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com